भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात शहिदांना श्रद्धांजली
Tribute to martyrs at P.K. Kotecha Mahila College in Bhusawal भुसावळ (11 मे 2025) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या 26 भारतीय पर्यटकांसह ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या सर्व भारतीय जवानांना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
आपल्या मातृभूमी व देशप्रेमासाठी प्राणाचे बलिदान देणारे हे जवान शहीद झाल्यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्यास ईश्वर शक्ती देवो ही प्रार्थना करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.के.अग्रवाल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


