भरधाव डंपरने उडवले : नशिराबादचा तरुण ठार, दोघे गंभीर
A speeding dumper blew up a youth from Nashirabad : One killed, two others critical जळगाव (15 मे 2025) : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवार, 15 मे रोजी घडली. तेजस सुनील बिर्हाडे (21, रा.नशिराबाद, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे.
आहे.
मयत तरुण बॅण्ड पथकात कामाला
तेजस बिर्हाडे व त्याचे मित्र तुषार युवराज बिर्हाडे (19), अजय अफलातून सपकाळे (22 सर्व रा.नशिराबाद, ता.जळगाव) हेख ानदेश बँड पथकात काम करतात. हे तिघे गुरुवार, 15 मे रोजी जळगाव येथे बँड पथकातील कामासाठी दुचाकीने नशिराबाद येथून निघाले होते. काही अंतरावर आल्यावर राणे हॉटेलजवळ विरुद्ध दिशेने येणार्या भरधाव डंपरने तरुणांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातामध्ये तेजस बिर्हाडे हा जागीच ठार झाला तर तुषार व अजय या गंभीर जखमी झाला.
या तरुणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद येथील ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली. या ठिकाणी तेजसचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेतील डंपरासह चालकाला नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.