अमळनेरातून प्रेयसीला केलेला व्हिडिओ कॉल ठरला अखेरचा : लॉजमध्ये मृत आढळलेल्या तरुणासोबत काय घडले !
Video call from Amalner to girlfriend turned out to be the last: What happened to the young man found dead in Lodge! अमळनेर (15 मे 2025) : अहमदाबाद शहरातील एका तरुणाने अमळनेरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणावर पोस्कोचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.सौरभ शर्मा (रा. अहमदाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
लॉजमध्ये तरुणाचा मुक्काम
गेल्या पाच ते सहा दिवसापासून सौरभ शर्मा (रा.अहमदाबाद) याने अमळनेर येथील पाठक प्लाझामध्ये करणसिंग एम.पी. या नावाने लॉजमध्ये रुम बूक केली होती. घटनेच्या आदल्या रात्री सौरभने लॉजमधील कर्मचार्यांना मला सकाळी उशिरा उठवा, असा निरोप दिला होता.
13 रोजी दुपारी लॉजचे कर्मचारी त्याला उठवायला गेले तेव्हा त्याने आवाज दिला नाही. दरवाजा आतून बंद होता. सायंकाळी पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता आवाज आला नाही म्हणून पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आता पाहिले असता त्याने गळफास घेतलेला आढळून आला.
सौरभवर गुजरातमध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल आहे. त्याने मृत्यूपूर्वी प्रेयसीशी व्हिडीओ कॉल करून मी ‘ऑपरेशन मौत’ जवळ पोहोचलो आहे असे म्हटले आहे. सौरभने त्याच्या डायरीत मुलीचा व तिच्या नातेवाईकांचा उल्लेख केला असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.