जैन इरिगेशन सिस्टीम्सला 25.7 कोटींचा नफा
चौथी तिमाही आणि आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण मंजूर
Jain Irrigation Systems posts profit of Rs 25.7 crores जळगाव (15 मे 2025) : मायक्रो इरिगेशन सिस्टम्स, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, नवीकरणीय ऊर्जा उपाय, टिश्यूकल्चर रोपे, वित्तीय सेवा आणि इतर कृषी निविष्ठा यांच्या उत्पादनामध्ये गुंतलेलल्या जगातील दुसर्या व भारतातील सगळ्यात मोठ्या ठिंबक सिंचन प्रणालीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीचे 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि वर्षाचे लेखापरीक्षण केलेले (ऑडिटेड) एकत्रित आणि स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात आले. यात कंपनीला वर्षाच्या एकत्रित करपश्चात नफा 25.7 कोटी रूपये झाला आहे.
कर पश्चात नफा 25.7 कोटी रुपये
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव येथे दि. 14 ला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या चौथी तिमाही आणि आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण मंजूर करण्यात आले. जैन इरिगेशन कंपनीने वर्षाचे एकत्रित उत्पन्न 5779.3 कोटी रूपये नोंदवले गेले. इबिडा 716.8 कोटी रुपये नोंदवला. तर वर्षाचा एकत्रित करपश्चात नफा 25.7 कोटी रूपये झाला. 31 मार्च 2025 रोजी संपणार्या वर्षाचे स्वतंत्र उत्पन्न 3259 कोटी रुपये झाले. तर चौथ्या तिमाहीतील स्वतंत्र उत्पन्न 1027.3 कोटी रुपयांवर पोहोचले.
याबाबत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी माहिती दिली आहे. 2024-25 आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीने एकूण महसुलात 1.3 टक्के सुधारणा करत स्थिर कामगिरी नोंदवली. संपूर्ण वर्षात महसूलात झालेली घट प्रामुख्याने देशांतर्गत व्यवसायामुळे झाली. मात्र, कामकाजातील रोख प्रवाहात लक्षणीय सुधारणा झाली असून हे कार्यक्षम खेळत्या भांडवलाच्या व्यवस्थापनामुळे शक्य झाले आहे.
किरकोळ मागणीत पुनरुज्जीवन
पाईपिंग, हाय-टेक अॅग्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या आमच्या मुख्य व्यवसायांवर लक्ष केंद्रित करत आहोत. पुढील काळात सरकारच्या पायाभूत सुविधा खर्चामुळे आणि स्थिर कृषी उत्पादनामुळे आम्हाला किरकोळ मागणीत पुनरुज्जीवन होईल अशी अपेक्षा आहे. आमचे लक्ष्य कर्ज कमी करणे, खेळते भांडवल कार्यक्षम करणे आणि रोख प्रवाह सुधारणा करणे असल्याचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
अनिल जैन म्हणाले.