राज्यात डॉ.उल्हास पाटील रुग्णालय ठरले पहिले खाजगी वैद्यकीय महाविद्यालय
ग्रामीण व शहरी भागातील गंभीर रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच उत्कृष्ट उपचार
Dr. Ulhas Patil Hospital becomes the first private medical college in the state न्युज डेस्क । जळगाव (16 मे 2025) : वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक क्षण अनुभवास आला असून डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयुएचएस) अंतर्गत सुपर स्पेशालिटी कोर्सेस सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिले खाजगी वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे. अतिजटिल व अत्याधुनिक वैद्यकीय क्षेत्रात विशेष प्रावीण्य देणारी असून, ग्रामीण व शहरी भागातील गंभीर रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच उत्कृष्ट उपचार मिळू शकणार आहेत. या कोर्सेसच्या स्थापनेसाठी संस्थेने आधुनिक वैद्यकीय उपकरणे, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, दर्जेदार शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि अत्युच्च शैक्षणिक गुणवत्ता या सर्व गोष्टींची पूर्तता केली आहे. सध्या प्रवेश प्रक्रिया एमसीसीच्या माध्यमातून सुरु असून, इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी वेबसाइट्सवर भेट द्यावी.
चार सुपर स्पेशालिटी कोर्सेससाठी मान्यता
डीएम- कार्डिओलॉजी,
डी एम- न्युरोलॉजी,
एमसीएच – युरोलॉजी
एमसीएच- न्युरोसर्जरी
सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळणार
ही मान्यता केवळ आमच्या संस्थेच्या प्रगतीची पावती नाही, तर उत्तर महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आता या भागातील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. तसेच आमच्या विद्यार्थ्यांना घरच्या घरीच सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळणार असल्याचे गोदावरी फाउंडेशनचे चेअरमन डॉ.उल्हास पाटील म्हणाले.