19 मे रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन
District level Women’s Democracy Day on 19th May जळगाव (16 मे 2025) : जळगाव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या सोमवार, 19 मे रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे.
समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसर्या सोमवारी राबविण्यात येतो.
या अनुषंगाने येत्या 19 मे रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गरजू महिलांनी वेळेत जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपस्थीत राहण्याचे आवाहन माहिती महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.