गुरांना पाणी पाजताना तोल गेला माहिजीतील तरुण तापी पात्रात बुडाला


पाचोरा (16 मे 2025) : माहिजी गावातील तरुणाचा म्हशींना पाणी पाजण्यासाठी गिरणा डोहात गेल्यानंतर बुडून मृत्यू झाला. आकाश राजेश यादव (25) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आकाश यादव हा गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास माहेजी गावाजवळील गिरणा नदी पात्रात आपल्या म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेल्यानंतर अचानक त्याचा पाय घसरून तो थेट नदीतील खोल डोहात पडला. आकाशला पोहता न येत असल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सायंकाळ झाली तरी आकाश घरी परतला नसल्याने त्याच्या भावाने शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्याचा मृतदेह नदीतील डोहात आढळला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले. आकाश यादव हा अत्यंत मेहनती, शांत स्वभावाचा तरुण होता. त्याच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !