भुसावळातील हर्षल सावकारे यांचा शिक्षण व क्रीडा विभागाकडून सत्कार
Harshal Savkare from Bhusawal felicitated by the Education and Sports Department भुसावळ (17 मे 2025) : शहरातील एन.के.नारखेडे विद्यालयातील हर्षल मनोज सावकारे याने रोलर रिले स्केटिंग राज्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. संभाजीनगरात झालेल्या रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात भुसावळ शहराचे प्रतिनिधीत्व करीत हर्षलने उत्तम कामगिरी करून संघाला यश मिळवून दिले.
संभाजीनगरात झालेल्या 43व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सुवर्णपदक प्राप्त केले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल थायलंड पटियाला येथे होणार्या सातव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली. त्याबद्दल पंचायत समिती भुसावळ बीआरसीमध्ये भुसावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भुसावळ तालुका समन्वयक प्रदीप साखरे, निलेश पाटील, प्रमोद गांधेले, सचिन पाटील, देवानंद वाघधरे, मनोज सावकारे, आदींनी त्याचे स्वागत केले व पुढील एशियन स्पर्धेत विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
हर्षलला स्केटिंग प्रशिक्षक पियुष दाभाडे व दीपेश सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.