धुळ्यात जुन्या वादातून गोळीबार : दोन संशयीतांना अटक

Firing in Dhule over old dispute : Two suspects arrested धुळे (18 मे 2025) : शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील शंभर फुटी रोड भागातील अमन कॅफेवर जुन्या वादातून शाहरुख बाबु शाह (25, मोगलाई, साक्री रोड, धुळे) या तरुणावर गोळीबार करून मारहाण करण्यात आली होती. मंगळवार, 13 मे रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी संशयीत बिलाल सुबराती शाह (रा. काझी प्लॉट, धुळे) व हाशीम मलक अब्दुल रहेमान (मिल्लत नगर, धुळे) यास
गोपनीय माहितीवरून कारवाई
गोळीबार झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. आरोपींबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांना चाळीसगाव रोड पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 30 हजार रुपये किेंमतीचा गावठी कट्टा व चार हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदशानाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, हवालदार सुनील पाथरवट, हवालदार अविनाश वाघ, कॉन्स्टेबल शोएब बेग, अतीक शेख, सचिन पाटील, विनोद पाठक, देवेंद्र तायडे, सिराज खाटीक आदींच्या पथकाने केली.
