मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी : दोन लाख 23 हजारांच्या गांजासह दोघे जाळ्यात


Big achievement by Muktainagar police: Two arrested with ganja worth Rs 2.23 lakh मुक्ताईनगर (18 मे 2025) : मुक्ताईनगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गांजाची तस्करी करणार्‍या दोघांना अटक करीत त्यांच्याकडून दोन लाख 23 हजार रुपये किंमतीचा 11 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई शुक्रवार, 16 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता धामणगाव फाट्याजवळ करण्यात आली. अटकेतील आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा शिवारातील धामणगाव फाट्याजवळून दोन जण अवैधपणे गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. शुक्रवार, 16 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास काकोडा शिवारातील धामणगाव देशकुंडा हनुमान मंदिराजवळील नाल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर संशयीत येताच त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या झडतीदरम्यान 11 किलो ओलसर गांजा आढळल्याने तो जप्त करण्यात आला.


दोघा आरोपींना अटक
पोलीस नाईक हरीष गवळी यांच्या फिर्यादीवरून आरोपी आकाश उर्फ संतोष विष्णू रावळकर (27) व संजय जवरे (27, दोन्ही रा.कुर्‍हा, ता.मुक्ताईनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून दोन लाख 23 हजार 800 रुपये किंमतीचा 11 किलो 194 ग्रॅम ओलसर गांजा जप्त करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !