खासदार स्मिताताई वाघ यांना संसदेतील उत्कृष्ट कार्यासाठी ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर
MP Smitatai Wagh awarded ‘Sansadratna’ for her outstanding work in Parliament न्युज डेस्क । जळगाव (18 मे 2025) : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांना संसदेतील उत्कृष्ट कार्यासाठी ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला.
दोन्ही सभागृहातील सतरा खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश आहे. प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने यंदा सतरा नावांची घोषणा केली आहे. यात भर्तृहरी माहताब, सुप्रीया सुळे, श्रीरंग बारणे आणि एनके प्रेमचंद्रन या चार खासदारांना सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात येणार आहे तर उर्वरित 13 नावांमध्ये जळगावच्या खासदार स्मिताताई उदय वाघ यांच्या नावाचा समावेश आहे.
लोकशाही मूल्यांना मजबूत करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणार्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. खासदार स्मिताताई वाघ यांनी आपल्या लोकसभेतील पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामाची अमीट छाप अंकीत केली असून याचमुळे त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.