ज्ञानाची गंगोत्री असलेली संस्कृत अनेक शोधांची जननी : डॉ.मंजुषा कुलकर्णी
संस्कृत शिक्षणासाठी संस्था चालकांसह मुख्याध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Sanskrit, the Gangotri of knowledge, is the mother of many inventions: Dr. Manjusha Kulkarni जळगाव (19 मे 2025) : गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अॅण्ड पॉलिटेक्निक, जळगाव येथे संस्कृत प्रचारार्थ एक संवाद परिषद उत्साहात झाली. मंत्रालयातील प्रशासन अधिकारी डॉ.मंजुषा कुलकर्णी या प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
संवाद परिषदेचे आयोजन संस्कृत भारती, जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना आणि गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्था संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयंतराव पाटील होते. परिषदेच्या संयोजिका डॉ.पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
संस्कृत अनेक शोधांची सुद्धा जननी
मार्गदर्शन करताना डॉ.पाटील म्हणाल्या की, संस्कृत भाषा अत्याधुनिक ज्ञान मिळविण्यासाठी सुद्धा निश्चितच उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. ज्ञानाची गंगोत्री असलेली संस्कृत अनेक शोधांची सुद्धा जननी आहे हे त्यांनी उदाहरण घेऊन स्पष्ट केले. प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी संस्कृत ही केवळ सर्व भाषांचीच नव्हे तर सर्व ज्ञानाची सुद्धा जननी आहे हे स्पष्ट करून संस्कृत भाषेतील ग्रंथ भांडार हा आपला अनमोल ठेवा आहे. युनेस्कोच्या वारसा यादीतदेखील आपल्या संस्कृत ग्रंथांचा समावेश होत आहे. ही आपल्या सर्वांची अभिमानाची बाब आहे. हा वारसा आपण जतन करितो भावी पिढीकडे सुपूर्त करायला हवा व त्यासाठी संस्कृत अध्ययनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात जयंतराव पाटील यांनीही संस्कृतचे महत्व विषद करून संस्कृत भरतीचे कार्यच कौतुक केले. जिल्ह्यात संस्कृतच्या कार्याला गती देण्यासाठी माझ्यासह आमची संघटना खारीचा वाटा निश्चित उचलेल, असे आश्वासन दिले.
प्रास्ताविक डॉ.केतकी पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्र.ह.दलाल यांनी केले. कार्यक्रमास प. पू.महामंडलेश्वर जनार्दन स्वामी यांनी आशीर्वादपर व्हिडिओ पाठविला होता. परिषदेला संस्कृत भरतीचे क्षेत्रीय,प्रांत, व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता श्री ब्रजेश पंडित यांनी म्हटलेल्या शांती मंत्राने झाली कार्यक्रमाची शिस्तबद्धता, व उपयोगितेबद्दल अनेकांनी गौरवोद्गार काढले