चोपड्यात ब्रेक फेल बसचा थरार : दोघांचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी


Shocking bus brake failure in Chopda : Two killed on the spot, two seriously injured चोपडा (20 मे 2025) : गजबजलेल्या भागातून बस जात असताना अचानक ब्रेक फेल झाल्यानंतर बसने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. या घटनेत रवींद्र बहारे (40) व सोनू रशीद पठाण (22) यांचा मृत्यू ओढवला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

काय घडले चोपडा शहरात
चोपडा शहरात स्वस्तिक टॉकिज परिसरात एसटी (एम.एच.40 एन.9828) ही बस लासूरकडून चोपडा आगारात येत असताना तिचे ब्रेक फेल झाले व बसने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. यात रवींद्र बहारे आणि सोनू रशीद पठाण हे दोघे ठार झाले.

या अपघातात अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून आमदार चंद्रकांत सोनवणे डॉक्टरांना तातडीने उपचाराचे निर्देश दिले. दरम्यान बसने दुचाकीस्वरांना चिरडल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !