भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी यावल भाजपकडून दुचाकी रॅली
भुसावळातील रॅलीमध्ये देखील यावलकरांचा सहभाग
BJP holds two-wheeler rally to boost morale of Indian soldiers यावल (20 मे 2025) : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यांकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले व पहलगाम हल्ल्यातील पर्यटकांना न्याय मिळवून देण्यात आला. तेव्हा भारतीय सैन्याचे मनोबल आणि उत्साह वाढवण्यासाठी रविवारी यावल भाजपाकडून दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील खरेदी विक्री संघापासून ही दुचाकी रॅली काढण्यात आली होती. तसेच यावलच्या रॅली नंतर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते हे भुसावळ येथे सायंकाळी आयोजित रॅलीत सहभागी होण्यासाठी देखील रवाना झाले.
यावल शहरात अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर तालुका खरेदी विक्री संघ आहे. या संघाच्या आवारात भारतीय सैन्य दलाचे मनोबल व उत्साह वाढवण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंदूरच्या यशा नंतर भारतीय सैन्य दलाचे कौतुक करण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली. दुपारी दोन वाजता शेतकी संघाच्या आवारात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव, वड्री सरपंच अजय भालेराव, शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन तेजस पाटील यांच्या नेतृत्वात एकत्र आले. व येथून दुचाकी ला भारतीय ध्वज बांधून दुचाकी रॅली काढण्यात आली.
दुचाकी रॅलीत सहभागी भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसुन आला. तर या दुचाकी रॅलीच्या नंतर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते हे भुसावळ येथे सायंकाळी काढण्यात येणार्या भव्य दुचाकी रॅलीत सहभागाकरिता रवाना झाले. या दुचाकी रॅलीच्या यशस्वी ते करिता भाजपा किनगाव मंडळाध्यक्ष अनिल पाटील, यावल मंडळाध्यक्ष सागर कोळी व फैजपुर मंडळाध्यक्ष उमेश बेंडाळे सह आदींनी परिश्रम घेतले.