भुसावळ रेल्वे विभागातर्फे ऑपरेशन सिंदूर सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली


Grand Tricolor Rally in honour of Operation Sindoor by Bhusawal Railway Department भुसावळ (21 मे 2025) : भुसावळ रेल्वे विभागात ऑपरेशन सिंदूर या शौर्यपूर्ण मोहिमेच्या सन्मानार्थ रविवार, 18 मे रोजी सकाळी सात वाजता विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयापासून रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेकडे एक भव्य व सुसंगत तिरंगा रॅली काढण्यात आली.

या तिरंगा रॅलीचे नेतृत्व विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पाण्डेय यांनी केले. रॅलीत रेल्वे अधिकारी, कर्मचारी, क्रीडापटू, स्काऊट्स अँड गाईड्स, सिव्हिल डिफेन्स संघ, सेंट जॉन अँम्ब्युलन्स सेवा, रेल्वे शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. देशभक्तीच्या भावनेने भारलेले वातावरण मार्चदरम्यान अनुभवायला मिळाले.

भुसावळ रेल्वे स्थानकावर ही तिरंगा रॅली देशभक्तिपर घोषणांनी समाप्त झाली. रेल्वे स्थानक परिसर राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला व उपस्थित नागरिक व रेल्वे कर्मचार्‍यांनी तिरंग्याला अभिवादन केले.

ऑपरेशन सिंदूरमधील शौर्याला मानवंदना वाहणे व रेल्वे कुटुंब व समाजामध्ये ऐक्यभावना दृढ करणे, हे या तिरंगा रॅलीचे मुख्य उद्दिष्ट होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !