जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : अकोलासह बुलढाण्यातील बॅटरी चोरट्यांना 24 तासात बेड्या


Performance of Jalgaon MIDC Police: Battery thieves from Akola and Buldhana arrested within 24 hours जळगाव (21 मे 2025) : शहरातील अजिंठा चौफुलीजवळ चौधरी बॅटरी ट्रेडींग या दुकानातून चोरट्यांनी 41 हजार रुपये किंमतीच्या 41 बॅटर्‍या लांबवल्या होत्या. एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 24 तासात गुन्ह्याची उकल करीत आरोपींना अटक केली.

24 तासात आरोपी जाळ्यात
जळगावातील अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी (47, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांचे जळगाव जुन्या शहरात अजिंठा चौफुली येथे मानस हॉटेल शेजारी चौधरी बॅटरी ट्रेडींग नावाचे बॅटरीचे दुकान आहे. 17 ते 18 मे दरम्यान चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवत 41 हजार रुपये किंमतीच्या बॅटरी चोरी केल्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक कौशल्य तसेच सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत अजमद उल्ला अमानत उल्ला खान (24, पिंपळगाव राजा, ता.खामगाव, जि.बुलढाणा) व सैय्यद दानिश सैय्यद ईस्माईल (25, घोडेगाव, ता.तेल्हारा, जि.अकोला) यांना मंगळवारी अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली सहा लाख रुपये किंमतीची बोलेरो (एम एच.30 बी.डी. 6873) व 31 हजार रुपये किंमतीच्या बॅटर्‍या जप्त करण्यात आल्या.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, एएसआय दत्तात्रय बडगुजर, नाईक प्रदीप चौधरी, कॉन्स्टेबल सिध्देश्वर डापकर, रतन गीते, योगेश बारी यांनी केली. तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !