एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : अल्पवयीनाकडून दोन लाखांचे महागडे मोबाईल जप्त


MIDC police take major action: Expensive mobile phones worth Rs 2 lakh seized from minor न्युज डेस्क । जळगाव (21 मे 2025) : शहरातील नशेमन कॉलनीतील तन्वीर मजहर पटेल यांच्या घरातून चोरलेले दोन लाख रुपये किंमतीचे आयफोन व वन प्लस चोरीला गेले होते. याप्रकरणी अल्पवयीनास ताब्यात घेण्यात आले.

तन्वीर पटेल यांच्या घरात अज्ञात चोरट्याने 18 मे 2025 रोजी मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास प्रवेश करून मोबाईल चोरले होते. या घटनेनंतर 19 मे रोजी पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.


एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ तपासाचे निर्देश दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी फिर्यादीच्या घराजवळ एक अल्पवयीन मुलगा फिरत असताना दिसल्यानंतर त्यास शोधून ताब्यात घेण्यात आले. विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले दोन्ही आयफोन आणि वन प्लस मोबाईल चोरीनंतरच्या 24 तासांच्या आत हस्तगत करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, रामकृष्ण पाटील, किरण पाटील, छगन तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकुर, योगेश बारी, योगेश घुगे आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !