मित्राला वाचविताना ‘इन्साफ’ बुडाला : धुळे तालुक्यातील घटना


‘Insaf’ sank while saving a friend: Incident in Dhule taluka अमळनेर (23 मे 2025) : अमळनेर येथील रहिवासी व नुकताच साखरपुडा झालेला इन्साफ आझाद खान (वय 22) या तरुणाने त्याचा मित्र मयूर गांगुर्डे याला वाचविताना स्वतःचा जीव गमावल्याची घटना धुळे तालुक्यातील अवधान शिवारात घडली.

इन्साफच्या पश्चात आई- वडील आणि भाऊ अरबाज असा परिवार आहे. वडील आजाद खान हे येथील मुंदडा बिल्डर्समध्ये जेसीबी ठेकेदार आहेत तर भाऊ अरबाज हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. इन्साफ आणि त्याचा मित्र मयूर मोहन गांगुर्डे (वय 25, दोन्ही रा. अमळनेर) हे दोघे धुळे येथील एसव्हीकेएम महाविद्यालयात बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते. दोघेही मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता अवधान शिवारातील धरणावर गेले होते. यावेळी मयूरचा तोल गेल्याने तो धरणाच्या पाण्यात बुडू लागला. हे पाहून इन्साफने त्याला हात देत बाहेर काढले. मात्र हे करीत असताना इन्साफचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला. इन्साफने मित्राला तर पाण्यातून बाहेर काढले परंतु तो स्वतः बुडाला.

यावेळी इतरांनी धाव घेत त्यालाही पाण्यातून बाहेर काढले. पण तो बेशुद्ध झाला होता. त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी सात वाजेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. अभ्यासात पुढे असणारा इन्साफ, मैत्री आणि जबाबदारी या जीवनमूल्यांमध्येही तितकाच उदात्त होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !