पिळोदा शेत शिवारात केळीच्या शेतात 28 वर्षीय शेतकर्याला सर्पदंश
A 28-year-old farmer was bitten by a snake in a banana field in Piloda Shet Shivara. यावल (23 मे 2025) : यावल तालुक्यातील पिळोदा शेत शिवारात 28 वर्षीय शेतकरी केळीच्या शेतात काम करत असताना अचानक त्यांच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निर्दशनास येताच त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले येथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
काय आहे नेमका प्रकार
पिळोदा, ता.यावल येथील शेतकरी अमोल संतोष पाटील (28) हे आपल्या केळीच्या शेतात काम करत असताना गुरूवारी दुपारी त्यांच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निर्दशनास येताच त्यांना उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, डॉ.ऋषभ पाटील, अधिपरिचारीका माधुरी ठोके, जॉन्सन चोरटे आदींनी उपचार सुरू केले.





