पिकअप वाहनातून गोवंश वाहतूक : दोघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल
Cattle transportation in pickup vehicle : Case registered against two in Yaval police station यावल (23 मे 2025) : यावल तालुक्यातील सांगवी या गावाजवळ यावल फैजपूर रस्त्यावर एका छोटा हत्ती पीकअप वाहनातून दोन जण गोवंश वाहतूक करत होते. याची गोपनीय माहिती यावल पोलिसांना मिळाली. पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी गोवंश आणि वाहन असा एकूण 77 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली. असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणाविरुद्ध प्राणी अधिनियमांवर गुन्हा दाखल करून गोवंश मनवेल गोशाळेत रवाना करण्यात आले.
काय आहे नेमके प्रकरण
सांगवी, ता.यावल या गावाजवळ यावल ते फैजपूर रस्त्यावर छोटा हत्ती पिकअप वाहन (क्रमांक एम. एच. 04 इ.वाय. 2118) याद्वारे अदनान सगीर कुरेशी रा. इस्लामपुरा, सावदा ता. रावेर हा व त्याच्यासोबत हमीद तडवी (परसाडे, ता.यावल) हे दोन जण दोन गोवंश वाहतूक करत होते. याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख, हवालदार मुस्तफा तडवी हे पथकासह त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी दोन गोवंश वाहन असा 77 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस हवलदार अशोक बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पकडण्यात आलेल्या या दोन गोवंशाची सुटका करून त्यांना मनवेल येथील रेवानंद गोशाळेत देखभाल साठी पाठवण्यात आले.




