महाराष्ट्राला धोक्याचा इशारा : जळगाव जिल्ह्यासाठी आगामी तीन दिवस ‘हा’ आहे हवामान विभागाचा इशारा


Danger warning for Maharashtra: Meteorological Department’s warning for Jalgaon district for the next three days is ‘this’ जळगाव (23 मे 2025) : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वादळी वार्‍यासह पाऊस सुरू आहे. हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यात आगामी तीन दिवस येलो अलर्ट कायम ठेवला आहे. जिल्ह्यात 25 मेपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

मान्सूनपूर्व पावसाने झोडपले
राज्यभरात अवकाळीनंतर आता मान्सूनपूर्व पाऊस चांगलंच झोडपून काढत आहे. यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे आजही अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने 23 मे तोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला होता. 24 आणि 25 मे कालावधीत या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर वादळी वार्‍यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 60 ते 60 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर वादळी वार्‍यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार 23 मे रोजी या जिल्ह्यांत ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !