धुळे रेस्ट हाऊसमधील पावणे दोन कोटींचे घबाड प्रकरण : आयकर अधिकार्‍यांशी दोन तास चर्चा


Dhule Rest House scam worth Rs 2.5 crore: Two-hour discussion with Income Tax officials धुळे (25 मे 2025) : राज्यात गाजत असलेल्या धुळे रेस्ट हाऊसमधील घबाड प्रकरणात आयकर विभागाचे अधिकारी जे.पी.स्वामी यांनी शनिवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात भेट दिल्यानंतर त्यांनी धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्याशी दोन तास चर्चा केली.

निलंबित स्वीय सहाय्यकाचे कॉल डिटेल्सची चौकशी होणार
धुळे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल्या 11 आमदारांच्या अंदाज समितीला देण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये गुलमोहोर विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीत असल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे व पदाधिकार्‍यांनी केल्यानंतर अधिकार्‍यांच्या उपस्थितीत खोलीची झडती घेतल्यानंतर त्यात तब्बल एक कोटी 84 लाख रुपये सापडले होते. या प्रकरणी समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहायक किशोर पाटील यांना तातडीने निलंबित करण्यात आले व धुळ्यात त्यांची पोलिस अधीक्षकांनी शनिवारी पाच तास चौकशी केली.




किशोर पाटील यांच्या मोबाईलवर आलेल्या व गेलेल्या कॉल्सची आता चौकशी केली जाणार आहे. विधी मंडळ समितीला देण्यासाठी पैसे जमा केल्याच्या आरोपामुळे गुलमोहोर विश्रामगृहातील जप्त रोकडने राज्याचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, पाटील हे धुळ्यातील खाजगी हॉटेलमध्ये मुक्कामी असून या प्रकरणात आता काय कारवाई होते ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !