कुत्र्यांनी मासे खाल्ले नराधमाने आईलाच संपवले : थाळनेर हद्दीतील घटना

Dogs ate fish, man killed mother : Incident in Thalner area थाळनेर (25 मे 2025) : आईने जेवणासाठी बनवलेले मासे कुत्र्यांनी खाल्ल्यानंतर संतापवलेल्या नराधम मुलाने आईलाच संपवल्याची संतापजनक घटना धुळे तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाणे हद्दीतील वाठोडे गावात घडली. टीपाबाई रेबला पावरा (67) असे खून झालेल्या आईचे तर आवलेस रेबला पावरा (25, खैरकुटी, ता.शिरपूर) असे नराधम आरोपी मुलाचे नाव आहे.
काय घडले नेमके
शनिवार, 24 रोजी रात्री आठ वाजता थाळनेर पोलीस ठाणे हद्दीतील वाठोडे गावातील देवेंद्र भिलेसिंग राजपूत यांच्या ताजपुरी शिवारात बारेला या मुलासह वास्तव्यास होत्या. शनिवारी रात्री त्यांनी जेवणासाठी मासे बनवले मात्र अचानक कुत्र्याने येवून हे मासे खाल्ल्याने संतापलेल्या आवलेस पावरा याने लाकडी दांडक्याने आईलाच मारहाण टीपाबाई यांचा मृत्यू ओढवला.
आईच्या मृत्यूनंतर नराधम मुलाने पळ काढला मात्र काही तासातच त्याला बेड्या ठोकण्यात यश आले.
