साडेचार लाखांचा ऐवज असलेली पर्स महिला विसरली : रेल्वे सुरक्षा बलाने मात्र अमानत परत केली
Woman forgets purse containing valuables worth Rs 4.5 lakhs: Railway Protection Force returns the deposit भुसावळ (25 मे 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत अकोला स्टेशनवर तिकीट खिडकीवर राहीलेली साडेचार लाख रूपयांचा ऐवज असलेली पर्स ‘ऑपरेशन अमानत’ मोहिमेअंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने संबंधित महिला प्रवाशाकडे सोपवली. पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा चार लाख 50 हजार रूपयांचा ऐवज हेाता.
काय घडले नेमके ?
बुधवार, 21 मे रोजी ट्रेन क्रमांक 12105 विदर्भ एक्स्प्रेस मधून आलेल्या फरिनाज इलियास शेख (वय 33, रा. वरळी, मुंबई) या महिला प्रवाशांची पर्स अकोला स्टेशनवरील बुकिंग हॉलमध्ये विसरले होते. गस्तीवर असलेले सहाय्यक उपनिरीक्षक नितीन मिस्त्री आणि कर्मचारी शेख शोएब यांना हे पर्स ताब्यात घेत पर्स कोणाची आहे, याची चौकशी केली असता कोणीही पर्सवर दावा केला नाही, त्यामुळे ते पर्स आरपीएफ ठाण्यात जमा केली मात्र थोड्या वेळाने फरिनाज शेख आणि त्यांचे पती इलियास नूर मोहम्मद शेख (वय 40) पर्सबद्दल चौकशी करत आरपीएफ कार्यालयात आले.

आरपीएफ यांनी मिळालेली पर्स दाखवल्यावर त्यांनी ती आपलीच असल्याचे सांगितले. मौल्यवान वस्तू असल्याने निरीक्षक यांच्या सूचनेनुसार, नितीन मिस्त्री यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून खात्री केली. चौकशीदरम्यान, फरिनाज यांनी सांगितले र्कीें त्या मुंबईहून अकोला येथे घरी आल्या होत्या आणि स्टेशनवर उतरून पार्किंगजवळच्या बुकिंग हॉलमध्ये नातेवाईकांची वाट पाहत असताना पर्स तिथेच विसरून गेल्या.
पर्स उघडल्यावर त्यात 4 तोळे वजनाचे सोन्याचे मंगॠसूत्र, 3 ग्रॅमचे छोटे मंगलसूत्र, 11 ग्रॅमची सोन्याची चेन, 2 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 4 ग्रॅमची चांदीची अंगठी, 3 ग्रॅमच्या 2 सोन्याच्या नथण्या, 10 ग्रॅमचे 4 सोन्याचे झुमके, 2 ग्रॅमचे बँटेक्स मंगलसूत्र, आधार कार्ड, एटीएम कार्ड आणि 7 हजार600 रुपये रोख असा एकूण अंदाजे 4 लाख 50 हजार रुपये किमतीचा ऐवज होता. आवश्यक कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे खात्री करून, आरपीएफने फरिनाज शेख यांना त्यांचा संपूर्ण ऐवज सुस्थितीत परत केला.




