कीर्तनाहून परतणार्‍या भुसावळातील भाविकाचा अपघाती मृत्यू


Devotee from Bhusawal dies accidentally while returning from kirtan भुसावळ (25 मे 2025) :  भागवत कथा आटोपून काल्याचे कीर्तन ऐकून घरी जात असतांना शहरातील गंगाराम नगरातील रहिवासी दशरथ राणे (68) यांचा अपघाती मृत्यू झाला. ही घअटना सोमवार, 19 रोजी दुपारी 1.50 वाजेच्या सुमारास अपघात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी 6.32 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला अपघात
शहरातील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी दशरथ नाटू राणे हे भागवत सप्ताहाच्या काल्याचे कीर्तन आटोपून घरी येत असताना महामार्ग ओलांडतांना एका अनोळखी गाडीने त्यांना जबर धडक दिली. यामुळे त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांना ट्रामा केअर सेंटरला उपचारार्थ हलविण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. या प्रकरणी दशरथ राणे यांचा पुतळ्या हरिश पंढरीनाथ राणे यांनी दिलेल्या माहिती वरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी भेट देत पाहणी केली. तपास हवालदार गणेश चौधरी करत आहेत.

दशरथ राणे हे धार्मिक वृत्तीचे होते. ते 5 जून रोजी जगन्नाथ महाराज यांच्या जाणार्‍या वारीत ते पंढरपूरला जाणार होते. त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. राणे यांच्या मृत्यू मुळे हळहळ व्यक्त करण्यात आली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !