एरंडोल शहरातील तरुणाचे डोके काँक्रिटीवर आपटले : पाच जणांविरोधात गुन्हा

गाढवे गल्ली परिसरातील घटना : तरुणाची प्रकृती गंभीर, जळगावात उपचार


A young man in Erandol city hit his head on concrete: A case has been registered against five people एरंडोल (26 मे 2025) : मोकळ्या जागेच्या वादातून शहरातील तरुणाचे डोके काँक्रिटच्या जागेवर आपटून त्याच्या प्राणघातक हल्ला झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाता गाढवे गल्ली परिसरात घडली. या प्रकरणात तरुणाच्या नातेवाईकांना संशयीताना मारहाण केली. याप्रकरणी पाच जणांविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जळगावात उपचार सुरू आहेत.

काय घडले एरंडोल शहरात
वीज कंपनीत नागदुली येथे ऑपरेटर असलेल्या अमोल कैलास पाटील (30, रा.गाढवे गल्ली, एरंडोल) यांना मोकळ्या जागेत दुचाकी लावण्याच्या वादातून पाच संशयीतांनी मारहाण केली तर तरुणाचे डोके काँक्रिट जागेवर आपटण्यात आल्याने मोठा रक्तस्त्राव झाला.

अमोल पाटील हा ड्युटीवरून आल्यानंतर त्याने दुचाकी (एम.एच.19 बी.एल.5114) ही तुकाराम पाटील यांच्या घरासमोरील व तक्रारदाराच्या घराजवळ लावल्याच्या रागातून संशयीताने लाकडी दांडक्याने मारहाण केली. तरुणाला वाचवण्यासाठी गेलेले कुटुंबातील सदस्यांना देखील संशयित आरोपींनी जबर मारहाण केली तर आशिश उर्फ आशू याने तरुण अमोल पाटील यास काँक्रिट जागेवर आपटल्याने त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.

या संशयीतांविरोधात गुन्हा
सचिन कैलास पाटील (29, गाढवे गल्ली, एरंडोल) यांच्या फिर्यादीवरून तुकाराम उर्फ आप्पा सीताराम पाटील, रोहित उर्फ बंटी तुकाराम पाटील, आशिश उर्फ आशु तुकाराम पाटील, दीपक उर्फ गोलू नामदेव पाटील, उषाबाई तुकाराम पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !