जळगावात एकाची दुचाकी पेटवली
One person’s bike was set on fire in Jalgaon. जळगाव (26 मे 2025) : जुन्या वादातून एका तरुणाला मारहाण करीत त्याच्या ओळखीच्या मित्राची दुचाकी पेट्रोल टाकून जाळण्यात आली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके
सुप्रिम कॉलनीत राहणार्या कोमल विनोद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी शिवा जाधव या तरुणाला जुन्या वादातून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर, गुरुवार, 22 मे रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर लावलेली सचिन राठोड यांची दुचाकी संशयित किरण शामराव चितळे आणि रवी राठोड (दोघे रा.सुप्रिम कॉलनी) यांनी पेट्रोल टाकून जाळून टाकली. या गंभीर प्रकारानंतर कोमल जाधव यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी किरण शामराव चितळे आणि रवी राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करत आहेत.