इलेक्ट्रीक मोटार सुरू करण्यासाठी गेला अन् जिवाला मुकला : जानवे गावात हळहळ


अमळनेर (26 मे 2025) : जानवे ग्रामपंचायत कार्यालयातील शिपायाचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 24 मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दीपक बाबुलाल पाटील (45, रा.जानवे, ता.अमळनेर) असे मयत शिपायाचे नाव आहे.

काय घडले नेमके
दीपक पाटील हे जानवे ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. गावातील पाणीपुरवठ्याच्या पाच विहिरींवरील मोटारी सुरू-बंद करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शनिवारी दुपारी ते गावातील ‘मडक्या विहिर’ येथे मोटार चालू करण्यासाठी गेले असता मोटार सुरू होत नसल्याने त्यांनी पाईप हलवून ती सुरू करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा अचानक तोल गेला आणि ते विहिरीत पडले. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ृमात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पाटील कुटुंबीय आणि गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !