लॉज मालकाची सतर्कता : भुसावळात दोन बांग्लादेशी तरुणींना पकडले
धागेदोरे मुंबईपर्यंत : बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल :

Lodge owner’s vigilance : Two Bangladeshi girls arrested in Bhusawal भुसावळ (27 मे 2025) : बांग्लादेशातून कलकत्ता व तेथून मुंबईत जाण्यापूर्वीच दोन बांग्लादेशी तरुणींना भुसावळात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील एका लॉजमध्ये या तरुणी मुक्कामासाठी खोली मागत असताना लॉज मालकाला आधार कार्डाचा संशय आला व तरुणींचे बिंग फुटले.
अशी आहे नेमकी भानगड
मूळच्या बांग्लादेशातील 22 व 26 वर्षीय तरुणी बांग्लादेशातून एजंटांमार्फत कलकत्ता येथे आल्या व तेथून दोघांच्या माध्यमातून त्या रेल्वेने भुसावळात आल्या. येथून या तरुणी मुंबई जाणार होत्या मात्र मुंबईतील ‘दीदी’ने भुसावळातच मुक्कामी थांबा, तुम्हाला घेण्यासाठी माणूस येत असल्याचा निरोप दिल्याने दोन्ही तरुणी खोली शोधत लॉजमध्ये धडकल्या. यावेळी रूम करण्यासाठी दिलेल्या आधारकार्डाबाबत लॉज मालकाला संशय आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती देताच दोघांना ताब्यात घेण्यात आले.

दोघा तरुणींविरोधात गुन्हा
बाजारपेठ पोलीस पथकाने तत्काळ दोन्ही तरुणींना अटक करीत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लॉज मालकाच्या सतर्कतेने तरुणींना अटक करण्यात आली असलीतरी एजंटांचे थेट बांग्लादेश नेटवर्क असल्याचा प्रकार यातून समोर आला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
