जळगावात गांजा तस्कराला बेड्या : रामानंद नगर पोलिसांची कारवाई
Ganja smuggler arrested in Jalgaon : Ramanand Nagar police take action जळगाव (1 जून 2025) : जळगावच्या रामानंद पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे गांजा तस्कराला बेड्या ठोकलत 13 हजार 600 रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. रमेश बाबासाहेब झेंडे (54, रा.राजीव गांधी नगर) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी सहा वाजता राजीव गांधी नगरात करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील हरिविठ्ठल परिसरात एक व्यक्ती विक्री करण्यासाठी गांजा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकाला निर्देश दिले. सहाय्यक निरीक्षक संदीप वाघ, संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार, हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, प्रवीण भोसले, प्रमोद पाटील, रेवानंद साळुंखे, मनोज सुरवाडे, अतुल चौधरी, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, उमेश पवार, अजित शहा, प्रवीण सुरवाडे, दीपक वंजारी, अनिल सोननी, आशा गायकवाड, शिला गांगुर्डे आदींनी राजीव गांधी नगरात सापळा रचला.
संशयीत रमेश झेंडे आल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली असता 13 हजार 600 रुपये किंमतीचा गांजा आढळल्याने तो जप्त करून रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रमेश बाबासाहेब झेंडे याला अटक करण्यात आली.