कुर्हा येथे धाडसी घरफोडी : दोन लाख 37 हजारांचा मुद्देमाल लांबवला
Daring house burglary in Kurha : Property worth Rs 2 lakh 37 thousand recovered मुक्ताईनगर (3 जून 2025) : बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख 37 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील कुर्हा येथे 31 मे ते 1 जूनदरम्यान घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घराला केले टार्गेट
कुन्हा येथील आनंद गोपाल शर्मा यांचे गायत्री नगरातील घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत बेडरूममधील कपाटातील सोने, चांदीचे दागिने लांबवले. त्यात 88 हजारांची 11 ग्रॅम वजनाची सोन्याची
मंगलपोत, 56 हजारांची 7 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, 48 हजारांची 6 ग्रॅमची कर्णफुले, 20 हजारांचे 20 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण, 25 हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख 37 हजारांचा ऐवज लांबवला. मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गणेश शर्मा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयेश पाटील करीत आहेत. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले तर तज्ज्ञांनी ठसे टिपण्याचे प्रयत्न केले.





