रक्सोल एक्स्प्रेसखाली आल्याने भुसावळात अनोळखीचा मृत्यू


Unidentified person dies in Bhusawal after being run over by Raxol Express भुसावळ (3 जून 2025) : रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक पाचवर 12546 डाऊन रक्सोल एक्स्प्रेसखाली आल्याने 40 वर्षीय अनोळखीचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 1 जून रोजी घडली. लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

उंची 5.5, नाक सरळ, डोक्याचे केस काळे-पांढरे, चेहरा गोल असे अनोळखीचे वर्णन आहे. अंगात राखाडी काळसर रंगाचा टी शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पँट असून ओळख पटत असल्यास लोहमार्गचे नाईक प्रवीण राजपूरे (7038089615) वर संपर्क साधावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !