हिंगोणा गावाजवळ दोन दुचाकींचा अपघात : दोन्ही दुचाकीस्वार जखमी
Two-bike accident near Hingona village : Both bikers injured यावल (3 जून 2025) : यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ बर्हाणपुर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. यात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले आहे. हा अपघात रविवारी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडला.
हिंगोणा येथील अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर अर्शद शेख सुपडू (रा.मिल्लत नगर, फैजपूर) हे दुचाकी क्रमांक (एम.एच. 19 डी.एल. 1308) व्दारे यावलकडून फैजपूरला जात होते तर शिरसाड, ता.यावल येथील पुरुषोत्तम रामभाऊ साळी हे दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 बी.पी. 8942) व्दारे फैजपूरहून यावलच्या दिशेने येत असताना हिंगोणा गावाजवळ एका वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली व दोघेही वाहन चालक जखमी झाले.








