धुळ्यात 2200 किलो गांजासह सव्वाशे किलो अफू नष्ट


2200 kg of ganja and 125 kg of opium destroyed in Dhule धुळे (4 जून 2025) :  धुळे जिल्हा पोलिस दलाने विविध गुन्ह्यात जप्त केलेला दोन हजार दोनशे किलो गांजा, 125 किलो अफू तर तीन हजार शंभर किलो भांग पोलीस मुख्यालयाच्या उपयोगी हॉलमागील जागेत नष्ट केला. या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले. या विषयीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार आहे.

अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अंमली साठा जमिनीत पुरला
पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे, परिविक्षाधीन उपअधीक्षक सागर देशमुख आदी उपस्थित होते. जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खोदून अंमली पदार्थांचा साठा जमिनीत पुरण्यात आला व या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !