जळगावात चार महिन्यांचे मृत अर्भक सापडले : अज्ञात मातेविरोधात गुन्हा
Four-month-old baby found dead in Jalgaon : Case registered against unknown mother जळगाव (4 जून 2025) : तीन ते चार महिन्यांचे एक मृत नवजात अर्भक बेवारस अवस्थेत सोडून माता पसार झाल्याचा प्रकार शहरात घडला आहे. जळगाव शहरातील कांचननगर परिसरातील चौगुले प्लॉट भागात मंगळवारी दुपारी दोन वाजता ही घटना समोर आली.
शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले. अर्भकाचा मृत्यू कसा झाला आणि ते येथे कोणी टाकले, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या संदर्भात, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 94 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.