शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली गुरांची अवैध वाहतूक : 30 गुरांची सुटका

Shirpur taluka police stopped illegal cattle trafficking : 30 cattle rescued शिरपूर (4 जून 2025) : सेंधवाकडून शिरपूरकडे येणार्या एका वाहनात जाणारी 30 जनावरे सांगवी पोलिसांनी पकडली. 20 लाखांच्या गाडीसह अडीच लाखांचा मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी जप्त केला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
1 जून रोजी शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मालट्रक (क्रमांक आर.जे.32 जी.सी.2548) द्वारे गोवंश जातीची जनावरे भरून कत्तलीसाठी सेंधवाकडून शिरपूरच्या दिशेला नेली जात आहे. त्यानंतर पथकाला निर्देश दिल्यानंतर रून राष्ट्रीय महामार्गवरील सीमा तपासणी नाका हाडाखेड येथे मालट्रक येताना दिसला त्यास थांबवून पोलिस पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात एकूण 30 गोवंश जातीचे लहान-मोठी जनावररांची दाटीवाटीने निर्दयतेने वाहतूक होताना दिसून आले.
वाहन चालक लखमेंद्रा रामगोपाल सिंग (41, राजानीपूर कलान, ता. शिकारपूर, जि.बुलंद शहर, उत्तर प्रदेश) यास अटक करण्यात आली. वाहनातील दोन लाख 58 हजार रुपये किंमतीचे 30 गोवंश जनावरे व 20 लाखांची गाडी असा एकूण 22 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
