जळगावात तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न : जमावाने तरुणाला चोपले
जळगाव (5 जून 2025) : महाविद्यालयातील ओळखीच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आंतरजातीय विवाहासाठी तिला स्वत:च्या धर्माची शिकवण देणार्या तरुणाने जळगावात येऊन तिला बुरखा घालायला लावला आणि बुरखा काढला तर जिवे मारण्याची धमकी दिली. बुधवारी सकाळी हा प्रकार जळगाव शहरात घडल्याचे तरुणीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्या तरुणाला चोप देत पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
आत्महत्येची तरुणाकडून धमकी
यावल तालुक्यातील एका गावातील ही 22 वर्षीय तरुणी आणि शेजारच्या गावातील फरहान हकीम खाटीक (23) हे चोपड्यातील एकाच महाविद्यालयात शिकतात. प्रवासात त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. त्यातून त्यांचे समाज माध्यमावर तरुणीला धमकावून बुरखा घालायला लावलाबोलणे होत होते. त्यात या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. धर्म वेगळे असले तरी प्रेम हे प्रेम असते असे सांगत तिला स्वत:च्या धर्माची शिकवण देणार्या पोस्ट पाठवल्या. तिला आत्महत्येची धमकी देऊन लग्नासाठी होकार मिळवला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
बुधवारी ही तरुणी जळगावातील डी मार्टमध्ये आली होती. तिथे येऊन फरहान आणि त्याचा मित्र जमील कुरेशी यांनी तिला बुरखा घालायला सांगितला. तिने बुरखा परिधान केल्यावर तिच्यासोबत त्यांनी खरेदी केली. बिलाचे पैसे देताना तिने बुरखा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुन्हा तिला विरोध करण्यात आला. त्यावेळी इतरांनी चौकशी केली तेव्हा या तरुणीने झाला प्रकार इतरांना सांगितला. त्यानंतर त्या दोन्ही तरुणांना रामानंद पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तरुणीच्या फिर्यादीवरून त्या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला.