घटस्फोटीत महिलेवर जळगावात अत्याचार : बुलढाण्याच्या संशयीताविरोधात गुन्हा
Divorced woman raped in Jalgaon : Case against suspect of rape जळगाव (5 जून 2025) : विवाह जुळविणार्या साईटवर ओळख झालेल्या एकाने लग्नाचे आमिष दाखवून धुळे येथील एका घटस्फोटीत महिलेवर जळगाव शहरात अत्याचार केला. या प्रकरणी विनोद शिवराम कुसळकर (रा.वडपुरा रामनगर, जि.बुलढाणा) याच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे नेमके प्रकरण
बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाने विवाह जुळवणार्या एका वेब साईटवर धुळे येथील घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवत जळगाव येथे भेटायला बोलविले होते. यानंतर त्याने मागील मे महिन्यात 18 तारखेला त्या महिलेवर जळगाव रेल्वे स्टेशन शेजारील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवून तिच्यावर अत्याचार केले .
धुळे येथील 35 वर्षीय नोकरदार महिलेचा घटस्फोट झाला आहे. तिची व विनोद कुसळकर याची विवाह जुळवणार्या वेब साईटवर ओळख झाली. या दरम्यान, तरुणाने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला 18 मे रोजी जळगावात भेटायला बोलावले. दोघेही येथे आल्यानंतर रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे या तरुणाने महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर मात्र, महिलेने त्यांच्या लग्नाविषयी विषय छेडताच विनोद हा टाळाटाळ करू लागला. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने 1 जून रोजी शहर पोलिस स्टेशनला विनोद शिवराम कुसळकर विरोधात फिर्याद दिली.