साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून यावलला एका कुटुंबातील पाच जणांना मारहाण
एक गंभीर, महिलेचा विनयभंग ः सात जणाविरूध्द गुन्हा दाखल

Five members of a family beaten up in Yaval for not inviting them to a wedding reception यावल (5 जून 2025) : शहरातील बोरावल गेट भागातील एका कुटुंबाने साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून सात जणांनी त्यांच्याशी वाद घातला व महिलेचा विनयभंग करीत पाच जणांना मारहाण केली. यातील एक जण हा गंभीर जखमी असून या प्रकरणी यावल पोलिसात सात जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
निमंत्रण न दिल्याच्या वादातून मारहाण
शहरात बोरावल गेट भागातील रहिवासी एका कुटुंबातील मुलीचा साखरपुडा कोरपावली, ता.यावल येथे पार पडला. साखरपुड्याच्या कार्यक्रमात आमत्रंण दिले नाही या कारणावरून सोमवारी रात्री सशंयीत आरोपी मुसा मजीद पटेल, आरिफ उर्फ पप्पू मुसा पटेल, हुसेन मुसा पटेल, मीना मुसा पटेल, जावेद मुनाफ पटेल, अनिसा जावेद पटेल व यास्मिन जावेद पटेल यांनी हातात लाकडी लाठ्या-काठ्यांनी कुटूंबियांच्या घरात बळजबरीने घुसून त्यांना लाकडी काठ्यांनी डोक्यावर वार करीत जबर मारहाण केली व महिलेचा विनयभंग केला. या हाणामारीत कुटुंबातील महिला पुरूष असे पाच जण जखमी झाले एक 43 वर्षीय इसम हा गंभीर जखमी झाला. त्यास प्रारंभी यावल ग्रामीण रुग्णालय व नंतर गोदावरी फाउंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे.