जळगावात वृद्धेची सव्वादोन लाखांची पोत लांबवली
An old woman’s body worth two and a half lakhs was found in Jalgaon जळगाव (5 जून 025) : शहरातील नवीपेठ ते नवीन बसस्थानक दरम्यान प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधून तब्बल दोन लाख 20 हजार रुपये किंमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत लांबवण्यात आली. ही धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी 10 वाजता घडली. या प्रकरणी दुपारी चार वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील साक्री येथील रहिवासी असलेल्या लिलाबाई ताराचंदजी ताटीया (वय 65) या वृद्ध महिला आपल्या काही कामाच्या निमित्ताने मंगळवारी जळगाव शहरात आल्या होत्या.
नवीपेठ येथून नवीन बसस्थानकाकडे प्रवास करत असताना, गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून त्यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत चोरून नेली. सकाळी 10 वाजता ही घटना उघडकीस आली, त्यानंतर लिलाबाई यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांना काहीही माहिती मिळाली नाही. अखेरीस, त्यांनी दुपारी 4 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वीरेंद्र शिंदे करत आहेत. शहरात वाढत्या चोर्यांच्या घटनांमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.