इंदूरचे कपल हनीमुनला जाताच पतीची झाली क्रुर हत्या, पत्नी अद्यापही गायबच !
शिलाँग (5 मे 2025) : लग्नानंतरच्या मधुचंद्रासाठी मेघालयातील शिलाँगला आलेल्या मध्यप्रदेशातील इंदूरचे दाम्पत्याचा संपर्क होत नसताना कुटूंबियांन धाव घेतली असता 11 दिवसानंतर पतीचा मृतदेह सापडला तर विवाहिता सोनम मात्र अद्यापही बेपत्ता असल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले आहे. रेस्क्यू टीमला राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला असून त्याची ट्री कटरने हत्या झाल्याचे सांगण्यात आले.
हनिमूनसाठी पत्नी सोनमसोबत शिलाँगला गेलेल्या इंदूरच्या राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे उघड झालं आहे. पूर्वी खासी हिल्सचे एसपी विवेक सय्यम यांनी ही माहिती दिली आहे. राजाचा मृतदेह एका दरीत सापडला. राजाची ट्री कटरने हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र देखील जप्त केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. राजाच्या कुटुंबाने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.


इंदूरचा राजा रघुवंशी आणि पत्नी सोनम 22 मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला रवाना झाले. दोघेही सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होते. त्यानंतर अचानक दोघांचेही फोन बंद झाले. यामुळे इंदूरमधील त्यांचं कुटुंब खूप अस्वस्थ झालं. यानंतर, कुटुंबातील काही सदस्य स्वतः शिलाँगला पोहोचले मात्र तरी राजा आणि सोनमचा पत्ता लागला नाही. त्यांनी पोलिसांकडे मदत मागितली.
पोलिसांनी शिलाँगमध्ये शोध सुरू केला तेव्हा कपलने भाड्याने घेतलेली गाडी आढळली. कुटुंबाला आशा होती की, ते दोघेही सापडतील. मात्र आता 11 दिवसांनी जेव्हा तरुणाचा मृतदेह सापडला तेव्हा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या हातावर असलेल्या टॅटूवरून ओळख पटवल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस त्याची पत्नी सोनमचा शोध घेत आहेत.







