कासारखेडे गावात दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण


यावल (9 जून 2025) : यावल तालुक्यातील कासारखेडा या गावात मोटरसायकलचा कट लागल्यााच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका 24 वर्षीय तरुणाला चार जणांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
कासारखेडे गावात अजय हबीब तडवी (24) हा तरुण अंडा-आमलेटची हातगाडी चालवतो. मोटारसायकलचा कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून या तरुणाला जुम्मा सलीम तडवी, सलीम खलील तडवी (दोघे रा.विरावली) बाबू नजीर तडवी, विनोद बाबू तडवी (दोन्ही रा.कासारखेडे) या चार जणांनी शिवीगाळ करून त्याला लाठीकाठीने मारहाण केली. लोखंडी पट्टीने मारून दुखापत केली. या चार जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !