पाच हजारांची लाच भोवली : जळगावातील कंत्राटी वायरमन एसीबीच्या जाळ्यात


Five thousand rupees bribe: Contracted wireman from Jalgaon caught by ACB जळगाव (10 जून 2025) : मीटरचे सील तुटले असल्याने तुमच्यावर मीटरमध्ये छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल होईल व कारवाई टाळण्यासाठी तसेच मीटरचा रिपोर्ट ओके देण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगावातील कंत्राटी वायरमन भूषण शालिग्राम चौधरी (37, नेमणूक प्रभात कॉलनी कक्ष, जळगाव) यास जळगाव एसीबीने अटक केली.

असे आहे लाच प्रकरण
46 वर्षीय तक्रारदार यांच्या राहत्या घराचे वीज मीटर हे पूर्वीचे मालक यांच्या नावे असून महावितरणतर्फे वीज मीटर बदलण्याचे काम सुरू असताना तीन दिवसापूर्वी वायरमन भूषण चौधरी हे तक्रारदाराच्या घरी वीज मीटर बदलण्यासाठी आले असता त्यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुमच्या वीज मीटरचे सील तुटलेले आहे. तुम्ही त्यात छेडछाड केल्याने तुम्हाला आर्थिक दंड होऊन तुमच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल, वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व वीज मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ओके देण्यासाठी 15 हजारांची मागणी करण्यात आली व याबाबत मंगळवार, 10 रोजी एसीबी तक्रार करण्यात आली. लाच पडताळणीदरम्यान आरोपीने पंचासमक्ष पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, एएसआय सुरेश पाटील, हवालदार सुनील वानखेडे, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !