बडनेरा मेमूला उद्यापासून कजगावात थांबा
Badnera Memula will stop in Kajgaon from tomorrow. भुसावळ (10 जून 2025) : भुसावळ विभागातील कजगाव, ता.भडगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रायोगिक तत्वावर गाडी क्रमांक 01211/01212 बडनेरा-नाशिक विशेष मेमूला बुधवार, 11 जूनपासून एका मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थांबा जाहीर झाला असलातरी मेमू स्थानकावर थांबत नसल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासन व खासदारांकडे पाठपुरावा केला होता.
थांब्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा
गाडी क्रमांक 01211 (बडनेरा-नाशिक मेमू) बुधवार, 11 जूनपासून कजगाव स्थानकावर दुपारी 4.19 वाजता आल्यानंतर 4.20 वाजता प्रस्थान करेल.
गाडी क्रमांक 01212 (नाशिक-बडनेरा मेमू) बुधवार, 11 जूनपासून कजगाव स्थानकावर येण्याची वेळ 11.19 वाजता आल्यानंतर 11:20 वाजता प्रस्थान करेल.
प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




