दहिगावातील 32 वर्षीय महिलेचा विनयभंग


यावल (12 जून 2025) : यावल तालुक्यातील दहिगाव गावातील 32 वर्षीय महिला घरात एकटी असल्याचे पाहून गावातील तरुणाने तिच्या घरात प्रवेश करीत तिला मागून पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
दहिगावातील 32 वर्षीय महिला तिच्या घरात एकटी असल्याचे पाहून तिच्या मागच्या दरवाज्यातून नितीन लोटन महाजन यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि तिला मागून घट्ट पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत विनयभंग केला. याप्रकरणी यावल पोलिसात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !