सर्पदंश झाल्याने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू
13-year-old girl dies due to snakebite चोपडा (12 जून 2025) : चोपडा तालुक्यातील मालापुर येथे शेतातील घरामध्ये एका 13 वर्षीय मुलीला अचानक पायाला सापाने चावा घेतला मात्र उपचारदरम्यान जळगावात तिचा मृत्यू झाला. जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बाईसी शंकर पावरा (13, रा.मालापूर, ता.चोपडा) असे मयत बालिकेचे नाव आहे.
बाईसी ही कुटुंबीयांसह शेतातील घरामध्ये राहत होती. हात मजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरु होता. रविवार, 8 जून रोजी पहाटे 4 वाजता राहत्या घरी बाईसी हिला पायाला अचानक सापाने चावा घेतला. कुटुंबीयांना लक्षात येताच त्यांनी चोपड्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून सोमवार, 9 जून रोजी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता या बालिकेचा मृत्यू झाला.




