अहमदाबादमध्ये टेक-ऑफनंतर विमान कोसळले !

Plane crashes after takeoff in Ahmedabad! अहमदाबाद (12 जून 2025) : अहमदाबादहून लंडनला जात असलेले विमान टेक-ऑफनंतर अहमदाबाद शहरातील मेघानी परिसरात कोसळले त्यानंतर विमानाला भीषण आग लागली आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीसह 242 प्रवासी असल्याचे सांगण्यात आले. या अपघातात 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
अपघातग्रस्त विमान एअर इंडियाचं आहे. बोईंग ड्रीमलायनर 787 विमान 11 वर्षे जुनं असल्याची माहिती समोर आलेली आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानानं उड्डाण केलं. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाला. अपघात होताच विमानानं पेट घेतला.

दुर्घटनेनंतर, अहमदाबाद आणि वडोदरा येथून 25 अग्निशमन दलाच्या गाड्या अहमदाबादला पाठवण्यात आल्या आहेत. सुरतहूनही मदत आणि बचाव पथके अहमदाबादला पाठवण्यात आली आहेत.
माहितीनुसार, विमानाच्या ढिगार्यातून आतापर्यंत 50 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मदत आणि बचाव कर्मचारी आग विझवण्याचे काम करत आहेत तसेच ढिगार्यात जखमी आणि मृतांचा शोध घेत आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन पटेल सुरतहून अहमदाबादला रवाना झाले आहेत. मदत आणि बचाव कर्मचार्यांच्या अनेक पथकांना विमानतळावर पाठवण्यात आले आहे.
विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला. तथापि, याबद्दल अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही.
माहितीनुसार, एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. टेकऑफ दरम्यान ते विमानतळाच्या भिंतीला धडकले आणि आग लागली.
