रावेर पोलिसांची मोठी कामगिरी : अ‍ॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त


Big achievement of Raver police : Property worth eight lakhs seized in aluminum wire theft case रावेर (15 जून 2025) : रावेर पोलिसांनी सोलर प्रोजेक्टच्या चोरीचा पर्दाफाश करत चार लाख रुपयांच्या अ‍ॅल्युमिनीयमच्या तारांसह आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करीत दोघांना अटक केली आहे.

असे आहे प्रकरण
रावेरातील गट नंबर 1783 मध्ये सोलर प्रोजेक्टरचे काम सुरू आहे. यासाठी भरत कमलाकर महाजन (सरकारी ठेकेदार, रा.रावेर) यांनी प्रोजेक्टसाठी आणलेल्या चार लाख रुपये किंमतीचे 100 स्क्वेअर एमएम कंडक्टरच्या सहा अ‍ॅल्यूमिनीयम तारांचे बंडल चोरीला गेल्याची तक्रार 8 जून रोजी रावेर पोलीस ठाण्यात दिली होती .

रावेर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या पथकाने गुप्त माहिती, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरीचा छडा लावला. मुदस्सर शेख बदरुज्जमा शेख (36, रा.जुनेगाव चाळीत मोहल्ला, मुक्ताईनगर) तसेच सय्यद आकीब सय्यद हुसेन (22, रा. इदगाहनगर, मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेऊ प्राथमिक तपासात या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चार लाख रुपये किंमतीच्या अ‍ॅल्यूमिनीयमच्या तारांसह गुन्ह्यात वापरलेली चार लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो (एम.एच.43 बी.बी.0586) गाडी किंमत चार लाख रुपये असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, रावेर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, कल्पेश आमोदकर, संभाजी बिजागरे, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, विकारुद्दीन शेख, तसेच चालक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जमील शेख, हवालदार संतोष ईदा आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !