अमळनेर तालुक्यातील तरुणाचा वीज धक्क्याने मृत्यू


A young man from Amalner taluka died of electric shock अमळनेर (15 जून 2025) : अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील 28 वर्षीय तरुणाचा पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 13 रोजी घडली आहे. मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सचिन मनोहर पाटील (28) असे मृताचे नाव आहे.

काय घडले तरुणासोबत
सचिन हा कृषी उत्पादनांच्या मार्केटिंगचे काम करीत होता व त्याचे आई-वडील शेती करतात. सचिन हा शुक्रवार, 13 रोजी 4.30 वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेला. मात्र मोटर सुरू करताच विजेचा धक्का लागून तो फेकला गेला. त्याचा आवाज आल्याने आजूबाजूचे लोकांनी पाहिले असता तो जमिनीवर पडलेला होता व डाव्या हातात मोटरची वायर होती.

लोकांनी विजेचा प्रवाह बंद करत त्याला उचलून खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. सचिनच्या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. साहेबराव निंबा पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सुनील पाटील हे करीत आहेत.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !