चाळीसगावात चोरटे शिरजोर : दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख लांबवले


चाळीसगाव (15 जून 2025) : शहरातील निवृत्त कर्मचार्‍याच्या दुचाकीच्या डिक्कीतून भामट्याने दोन लाख रुपये लांबवले. ही घटना शहरातील भडगाव रोडवरील अंधशाळेजवळ गुरुवार, 12 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत वृद्धाच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
भडगाव रोडवरील संत रोहिदास सोसायटीतील रहिवासी शिरीषकुमार भास्कर लिंडायत (72) यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्या सुनेच्या स्टेट बँक कृषी शाखेतील खात्यातून गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास त्यांनी धनादेशाद्वारे दोन लाख रुपये काढले. आपल्या दुचाकीच्या डिकीत ठेवून ते घरी जाण्यासाठी निघाले. रस्त्यात जांभूळ खरेदी करून त्यांनी डिक्की उघडली असता, त्यात त्यांनी ठेवलेले दोन लाख रुपये मिळून आले नाहीत. त्यामुळे लिंडायत यांनी तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठले.

पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक संदीप घुले तपास करीत आहेत.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !